पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई न केल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

शिक्रापूर/ प्रतिनिधी

शिक्रापूर (ता.शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पोलीस स्टेशनला हजेरी सुरु असताना शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या माजी सरपंच तसेच पोलीस कर्मचाऱ्यास गलिच्छ भाषेचा वापर करत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत माजी सरपंचानी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा शिक्रापूर ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी चार दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन येथे पन्नास हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची हजेरी घेत असताना शिक्रापूरचे माजी आदर्श सरपंच रामराव सासवडे यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांबाबत गलिच्छ भाषेचा वापर करत खुनाची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून यावेळी अतिशय खालच्या पातळीचा वापर पोलीस निरीक्षक तावसकर यांनी केला असून दरम्यान पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत देखील असेच वर्तन केले आहे, याबाबत ची ऑडीओ क्लिप देखील प्रसारित झाली आहे, तर माजी सरपंच रामराव सासवडे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते यांसह काही मंत्र्यांकडे तक्रार करत याबाबत पुरावे देखील सादर केले आहे, परंतु सदर प्रकारची कुणकुण लागताच पोलीस निरीक्षक यांच्याकडील पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडे देण्यात आला आहे, परंतु सदर तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा एक मे रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर ग्रामस्थांसह, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्र शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या घडलेल्या या प्रकाराच्या तक्रारी बाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, सदर पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात आलेली सदर प्रकरणाची चौकशी लावण्यात आलेली असल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले

Previous articleशिक्रापुरात बनावट पद्धतीने सुरु होते कोविड केअर सेंटर
Next articleअसल्या कायद्यांना काय चुलीत घालायचं का…? सरपंच योगेश पाटे