सिद्धेगव्हाणमध्ये लसीकरणास चांगला प्रतिसाद

चाकण- प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव यांच्या विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेगव्हाण येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्याअध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या सुचनेनुसार लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे,खेड तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षा विद्याताई मोहिते, मा.उपसरपंच सत्यवान काळे,आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे यांच्या हस्ते करण्यात आले .

४५ वर्षा पुढील 200 ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. लस घेतल्यानंतर नागरिकांना विश्रांती करावी व भरपुर आहार घ्यावा, याविषयी सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे,युवा नेते रोहन मोहिते, उद्योजक उमेश मोरे, मा.चेअरमन अनिल साबळे,मा.उपसरपंच सत्यवान काळे,अशोक मोरे दौलत मोरे, मनोज मोरे, रणजित मोरे, ग्रा.पं.सदस्य अनिता मोरे,वृषाली साबळे, मोनिका गाडे, आरोग्य अधिकारी डॉ.इंदिरा पारखे, ग्रामसेवक साकोरे मॅडम,आरोग्य अधिकारी प्रेमलता दुबे, मेघा वानखेडे, सुवर्णा आरेकर संगीता गवारे,छाया इंगळे,प्रा.सुरेखा शेंडे,प्रा.गणेश गोसावी आदी उपस्थित होते .

Previous articleसरपंच संतोष कांचन यांनी वार्ड क्रं ६ मधील तातडीने समस्या मार्गी लावली
Next articleजागतिक पुस्तक दिनानिमित्त समयसूचक वक्ते, शिक्षकनेते धर्मराज पवळे यांचे स्वगत