स्मार्ट ग्राम आंबेठाण येथे दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर

चाकण : करंजविहिरे आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून स्मार्ट ग्राम आंबेठाण ग्रामपंचायतच्या सहयोगाने येथे एक दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये चाकणसह पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर.आर.उगले यांनी दिली.

खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध म्हणून ४५ वर्षापुढील नागरिकांना आधार कार्डची नोंदणी करून लसीकरण करण्यात येत आहे.चाकण एमआयडीसीमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे.त्यामुळे करंजविहिरे आरोग्य केंद्राच्या माध्यमातून स्मार्ट ग्राम आंबेठाण ग्रामपंचायतच्या सहकार्याने एक दिवसीय लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या लसीकरण शिबिरासाठी करंजविहिरे येथील सीएचओ वनिता कांबळे, आरोग्य सेवक अनिल बोंडे,आरोग्यसेविका राजश्री भालेराव,रुपाली जाधव,आशा वर्कर छाया रेटवडे,लता गिरी,ग्रामविकास अधिकारी आर.आर.उगले,सरपंच संघमित्रा नाईकनवरे,ग्रा.पं. सदस्य शांताराम चव्हाण,ग्रा.पं. सदस्या कल्पना मांडेकर,मुख्याध्यापक मारुती कांबळे यांच्यासह शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे लसीकरणास सहकार्य लाभले

Previous articleगोसासीमध्ये २०९ नागरिकांचे लसीकरण
Next articleस्मार्ट ग्राम आंबेठाण येथे एक दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर