मळवंडी ठुले लघुपाटबंधारे विभागाच्या मच्छीमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

पवनानगर- मळवंडी ठुले येथील लघुपाटबंधारे विभागाने परिसरातील मळवंडी ठुले,वारु,कोथुर्णे या गावाना पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव केला.पंरतु या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी तलावातील मच्छीमारी करण्यासाठी शासनाने ठेका पध्दतीने निलाव केला आहे.

पंरतु तलावातील मच्छीमारी करण्यासाठी ज्या संबंधित ठेकेदाराला मच्छीमारी साठी दिला आहे. त्या ठेकेदाराने मृत असलेले मासे माती मध्ये गाडण्या ऐवजी ते मासे तलावाच्या सांडव्याच्या मध्ये टाकुन दिले आहे.याबाबत अनेकदा संबधित ठेकेदाराला अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे पंरतु संबंधित ठेकेदार या कडे कानाडोळा करत असल्याचे स्थानिक नागरिक करत आहे.त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असल्याने यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे पाण्यातुन खरुज, सर्दी, डोकेदुखी चे प्रमाण वाढले आहे.

या कडे लघू पाटबंधारे विभागाचे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.त्यामुळे स्थानिक नागरिकांनी येत्या दोन दिवसांत संबंधित ठेकेदाराने मृत असलेली मच्छि ची योग्य प्रकारे विल्लेवाट न लावल्यास अंदोलनाचा इशारा दिला आहे.

Previous articleदावडी गाव ३० एप्रिल पर्यंत कडकडीत राहणार बंद
Next articleआमदार अतुल बेनके यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण