दावडी गाव ३० एप्रिल पर्यंत कडकडीत राहणार बंद

राजगुरूनगर- दावडी गाव हे खेड तालुक्यातील पूर्व भागातील मोठे गाव आहे.या गावात मोठी बाजारपेठा आहे.गावची लोकसंख्या दहा हजारावर आहे दावडी गावात अनेक वाडी,वस्त्या आहेत.गावात करोनाच्या वाढत्या रुग्णामुळे गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.गावात वाढते रुग्ण,व मृत्यू चे प्रमाण वाढत असल्याने गावात वातावरण घबराटीचे आहे.दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरण करण्यात आलेले आहे.1041 लोकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे.गावांतील उर्वरित 45 वयाच्या वरील लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे.गावात ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावत सिनिटायजर ची फवारणी करण्यात येणार आहे.व गावातील संपुर्ण लोकांची अँटीजीन चाचणी करण्यात येणार आहे.गावातील माझे गाव माझे कुटुंब या योजने अंतर्गत घरोघरी जात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती दावडी गावचे सरपंच संभाजी घारे,व उपसरपंच राहुल कदम यांनी दिली.

30 एप्रिल पर्यंत गाव बंद राहणार असून फक्त दवाखाने , अत्यावश्यक दुकाने चालू राहणार आहे. गावातील अंतर्गत रस्ते बंद केलेले आहे.गावातील सर्व नागरिकांना सूचना करण्यात आलेल्या आहे.घरात रहा,सुरक्षित रहा,गावातील वाढत्या करोना रुग्णाची साखळी तोडायची असेल तर गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपस्थित दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील,सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम,तलाठी सतीश शेळके, ग्रामसेवक तानाजी इसवे,ग्रामपंचायत सदस्य ,संतोष सातपुते,अनिल नेटके,मा शिक्षक सभापती रमेश होरे,मा उपसरपंच हिरामण खेसे,मारुती बोत्रे,ग्रामपंचायत कर्मचारी निलेश शिंदे,कोतवाल देवेंद्र ओव्हाळ उपस्थित होते.

दावडी गावाच्या लोकसंख्याच्या दृष्टीने आरोग्यकेंद्रांची इमारत मंजूर आहे.पण ही मंजुरी अजून कागदावरच आहे.पण हे काम लवकरात लवकर पूर्ण होवा.
आत्माराम डुंबरे पाटील-पोलीस पाटील दावडी

Previous articleकोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकारक – डॉ. सचिन खरात
Next articleमळवंडी ठुले लघुपाटबंधारे विभागाच्या मच्छीमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी