पिंक व्हॉटसअँप मेसेजपासून सावध राहा

प्रमोद दांगट

अलीकडे पिंक व्हॉटसऍप बाबतचा एक संदेश अनेक व्हॉटसग्रुपवर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हॉटसऍपचा अधिकृत संदेश नसून, सायबर हल्लेखोरांकडून पसरविला जाणारा मालवेअर असल्याचे सांगत अनेक सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या संदेशाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून व्हॉटस पिंक हे व्हॉटसअॅपचे अधिकृत अपडेट असून, दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास नवीन वैशिष्ट्यांसह तुमच्या व्हॉटसअॅप आयकॉनचा रंग गुलाबी होईल,’ असा संदेश अनेक व्हॉटसअॅप ग्रुपवर फिरत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे कोणती प्रक्रिया घडत नाही. मात्र ती लिंक आपोआप इतर चार जणांना पाठविली जाते, असा अनुभव अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.

याबाबत सावध राहण्याच इशारा देत, सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या लिंकचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप असणारे व्हॉटसअॅप हे नेहमीच सायबर हल्ले करणाऱ्यांचे मुख्य टार्गेट असते. वापरकर्त्यांचे नुकसान करण्यासाठी नेहमीच प्रयोग हे हल्लेखोर करतात. पिंक अॅप हा त्याचाच एक भाग आहे. हे एक प्रकारचे मालवेअर असून, लिंकच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधील माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यापासून सर्वांनी सावधता बाळगावी.

Previous articleउसने पैसे देत नसल्याने वेटरकडून मित्राचा खून
Next articleट्रॅक्टरच्या अपघातात वडील व मुलाचा मृत्यू