मांडवगण फराटा येथील कोविड सेंटरला पत्रकारांच्या आवाहनातून शिवसेनेकडून ५१ हजारांची मदत

मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरला सहकार्य व्हावे या भावनेतुन शिरूरच्या पुर्व भागातील पत्रकारांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश पञकार संघाच्या सदस्यांकडे सुपुर्द केला.

राज्यात कोरोनाचा कहर सुरु असुन अनेक सर्वसामान्य नागरिक बेड न मिळणे,वैद्यकिय सुविधा वेळेत न मिळणे यामुळे त्रस्त झाले आहेत.त्यात अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.हे सर्व असताना प्रशासकिय यंत्रणा,वैद्यकिय यंत्रणा यावर प्रचंड ताण असल्याचे सर्वत्र चित्र असल्याने शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील सर्व पत्रकार प्रशासनास सहकार्य मिळावे,नागरिकांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले असुन मदतीसाठी आवाहन करत आहे.या पत्रकारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी जिल्हा परिषद सदस्या यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या कोविड सेंटरला भेट देत पाहणी केली.यावेळी मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या मदतीचे कौतुक म्हणून स्वत: ५१ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश पत्रकार संघाचे पदाधिकारी दत्ता कदम,विठ्ठल गवळी, हनुमंत पंडीत यांच्याकडे सुपुर्द केला.या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार,भाजपाचे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे,रविंद्र कुटे,विकास सातव,ग्रा.पं सदस्य विरेंद्र शेलार,गणेश फराटे,संभाजी फराटे आदी उपस्थित होते

Previous articleमौजमजेसाठी तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी ; पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाकडून तिघांना अटक
Next articleउसने पैसे देत नसल्याने वेटरकडून मित्राचा खून