घरच्या घरी रोगप्रतिकारशक्ती तपासा व उपाययोजना घरी करा

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोनाच्या या महामारीमधे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप गरजेचे झाले आहे. कोरोनासारख्या आजाराशी लढण्यासाठी इम्यूनिटी स्ट्राँग असणे खुपच आवश्यक आहे.सफेद रक्तपेशी, अँटीबॉडीज आणि इतर अनेक तत्वांतून आपल्या शरीरात इम्यून सिस्टम तयार होत असते. इम्यून सिस्टम कमजोर असल्यास वारंवार आजार येतात. आपली इम्यून सिस्टम चांगली आहे किंवा कमजोर आहे हे आपणास घरच्या घरी स्वतःला ओळखला आले पाहिजे. तर मग तुमची स्ट्राँग इम्यून सिस्टम – जर औषधाशिवाय संसर्गातून बरे होत असाल सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होत असेल, जखम लवकर भरून येत असेल, सर्दी-खोकल्याचा लवकर परिणाम होत नसेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे.

तुम्हाला जर घरच्या घरीच तुमची इम्यूनिटी वाढवायची असेल तर किवी,संत्रे,लिंबू, दही, ब्रोकोली हे खा आणि वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती. तुमची रोगप्रतिकारशक्ती जर कमजोर असेल तर ती याप्रकारे ओळखा. कमजोर इम्युनिटी – घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त आजारी पडणे.सतत सर्दी, ताप, खोकला होत असणे. हवामान बदलताच काहीतरी त्रास होणे. काहीही खाण्या-पिण्यातून ताबडतोब इन्फेक्शन होणे. डोळ्यांखाली काळे डाग येणे. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने न वाटणे. संपूर्ण दिवस एनर्जी लेव्हल कमी असणे.कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे. पोटात गडबड होणे. चिडचिडेपणा जाणवणे. सहज आजारी पडणे. लवकर थकवा येणे, सतत थकवा जाणवणे. अशाप्रकारे तुम्हाला घरच्या घरीच आपली रोगप्रतिकारशक्ती किती आहे हे ओळखता येणार आहे तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर ती किवी,संत्रे,लिंबू, ब्रोकोली ही फळे खाऊन घरच्या घरीच वाढवता येणार आहे. यामुळे कोरोना सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आपले शरीर भक्कम होण्यासाठी मदत होईल.

Previous articleकोरोना- संचारबंदी नंतरच्या पर्यटनास MTDC सज्ज-प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे
Next articleमौजमजेसाठी तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी ; पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाकडून तिघांना अटक