उरुळी कांचन परिसरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई केली जाणार-स.पो.नि. दादाराजे पवार

अमोल भोसले

उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय कारणाशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरु नये तसेच बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी दिली.

उरुळी कांचन पोलिस – मार्शल च्या माध्यमातून विनामास्क फिरणाऱ्या ३१ व्यक्ती वर शनिवार (दि.१७) रोजी कारवाई मध्ये १५,५०० रुपये दंड वसूल केला.

माणुसकी आणि आधार ही देखील दोन सूत्रे आहेत कोरोनाशी लढाईची. कोरोना सारख्या संकटाचा सामना करण्यासाठी पोलिसांच्या खाकीवर्दीतही कायदा आणि सुव्यवस्थेशिवाय माणुसकी व आधार ही दोन्ही सूत्रे दडलेली आहेत. आपल्याला फक्त त्या नजरेतून बघायला हवं.

Previous articleकोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेमडिसिव्हर इंजेक्शनला फेविपॅरावीर व फॅबी फ्लु चांगला पर्याय -खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleसावरदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प मनोहर भिकाजी पवार यांचे निधन