कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन व परिसतील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये. कोरोना रोगाची साखळी तोडायची असेल तर घरात बसूनच प्रशासनाला सहकार्य करावे.  ग्रामपंचायतचे  कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व उरुळी कांचन पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी केले.

मास्कचा वापर न करणार्‍या ३७ दुकानदारांकडुन मागील तीन दिवसात ९३७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस व उरुळी कांचन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई चालू आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरूद्ध एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

 पोलिस हवालदार अमोल भोसले, शिवाजी बनकर, कर्डिले, होले व ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत गायकवाड आदी कारवाई करत आहेत.

Previous articleमाजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रयत्नातून रावलक्ष्मी ट्रस्टतर्फे मांडवगण फराटा येथील कोविड सेंटरला मिळाले ५० बेड
Next articleरेमडेसिवीर इंजेक्शन तालुक्याला कमी पडून देऊ नका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी