माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रयत्नातून रावलक्ष्मी ट्रस्टतर्फे मांडवगण फराटा येथील कोविड सेंटरला मिळाले ५० बेड

अमोल भोसले

मांडवगण फराटा येथील कोविड केअर सेंटर मधील उपलब्ध असलेले १०० बेडस् कमी पडू लागल्यामुळे रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा परिषद सदस्या सुजाता अशोक पवार यांच्याकडे बेड्स वाढविण्याची विनंती केली. या कोवीड सेंटरमध्ये असलेल्या उत्तम सोयी सुविधायुक्त विलगिकरणामुळे अनेक रुग्णांना व रुग्णांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

मांडवगण येथील कोविड सेंटर मुळे आम्ही स्वतःला वेळेत कुटुंबियांपासून विलगीकरण करून घेतलं त्यामुळे आमचे कुटुंबीय आज सुरक्षित आहेत. अश्या वेगवेगळ्या भावना अनेक बरे झालेले रुग्ण फोन करून माजी सभापती सुजाता पवार आणि आमदार अशोक पवार यांना कळवतात, त्या वेळेस नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून करत असलेल्या कामाचे समाधान वाटते. तसेच या समाजोपयोगी कामामध्ये पुण्याई मंगल कार्यालयाचे संभाजी फराटे यांनी बहुमूल्य साथ दिल्यामुळेच मी हे पाऊल उचलू शकले, संभाजी अप्पांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. अशी भावना यावेळी माजी सभापती पशुसंवर्धन तथा जि.प.सदस्या सुजाता पवार यांनी व्यक्त केली.

परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे उपलब्ध असलेले बेड अपुरे पडत आहेत. आपल्या भागातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांनी पुढाकार घेत राव लक्ष्मी ट्रस्टमार्फत मांडवगण येथे अधिकचे ५० बेड उपलब्ध करून दिले आहेत.

Previous articleदौंड मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Next articleकोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार