दौंड मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

दिनेश पवार,दौंड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सामाजिक न्याय विभाग दौंड शहर व तालुका यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच त्यांचे विचार व्यक्त करून साजरी करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, प्राध्यापक भिमराव मोरे,माजी नगरसेवक उत्तमराव सोनवणे,श्याम लोंढे, दीपक विघ्ने,जावेद सय्यद, जाकीर भाई शेख, मनोज हिरणावळे यांच्या हस्ते दौंड शहरातील महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज,यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड शहर अध्यक्ष दिपक सोनवणे,विनोद लवटे, गुणाजी शिंदे,लक्ष्मण बस गवंडी, दीपक पारदासणी,मंगेश बारवकर , साईनाथ इंगवले, राजू माने राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.

Previous articleपोलिस मित्र युवा महासंघाच्या वतीने कोविंड सेंटरला मदत
Next articleमाजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रयत्नातून रावलक्ष्मी ट्रस्टतर्फे मांडवगण फराटा येथील कोविड सेंटरला मिळाले ५० बेड