वाघोलीतील कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी

 वाघोली – येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बिजेएस काॕलेज मध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आमदार अशोक पवार यांनी भेट देत पाहणी करुन आढावा घेतला .

यावेळी हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,तहशिलदार विजयकुमार चोंबे, गटविकासअधिकारी प्रशांत शिर्के ,तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन खरात,वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे,वैद्यकीय आधिकारी वर्षा गायकवाड ,नोडल अधिकारी बाळासाहेब मखरे,माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे ,रामभाऊ दाभाडे,बाळासाहेब सातव,शिवदास उबाळे,ग्रामविकास अधिकारी अनिल कुभांर अदिसह सह वैद्यकीय कर्मचारी ,नागरिक उपस्थित होते

यावेळी आमदार अशोक पवार यांनी कोविड सेंटरची पाहणी करत ,तेथील रुग्णांना पुरवण्यात येत असलेल्या सोयिसुविधा, सह जेवणाची पाहणी करत समाधान व्यक्त केले ,तर रुग्णांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशा सबंधितांना सुचना दिला .यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून वाघोली कोविड सेंटर साठी तीन डाॕक्टर देण्याची मागणी करत तात्काळ दोन डाॕक्टरला मजुंर करुन घेतले. परिसरातील वाढती रुग्ण संख्या पाहता रुग्णालयात बेड मिळत नाही रुग्णालयातील सुविधा अपुरा पडत असल्याने  नॉर्मल लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड  सेंटर उपयुक्त ठरत असल्याने कोविड सेंटर मध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये यासाठी आमदारांकडून संबंधितांना काही सुचना देखील करण्यात आल्या तर वाघोली परिसरात लसीकरणाचा वेग देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येईल असे देखील आमदारांनी यावेळी सांगितले.

वाघोली परिसरात वाढत असेलेली रुग्ण संख्या पाहता आमदार अशोक पवार यांच्या मागणीने हवेली तालुक्यात सर्वात आधि वाघोली येथील सीसीसी (कोविड) सेंटर सुरु करण्यात आले ,यासाठी आमदार अशोक पवार स्वतःसतत पाठपुरावा  करत होते ,आज देखील  सर्व अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी कोविड सेंटरला भेट देत पाहणी करुन येथील सोयिसुविधाबाबत समाधान व्यक्त केले असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले.

Previous articleपवनानगर मध्ये संचारबंदी फक्त कागदावरच..
Next articleपोलिस मित्र युवा महासंघाच्या वतीने कोविंड सेंटरला मदत