पवनानगर मध्ये संचारबंदी फक्त कागदावरच..

पवनमावळ – परिसरात रोज अनेक कोरोना संसर्गजन्य रोगाचे रुग्ण सापडत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात दि.१४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली असुन पंरतू मावळ तालुक्यातील पश्चिम भागातील पवनानगर हि बाजारपेठ ४२ गावाची दळणवळणाची सोय असून या बाजारपेठेत (दि.१५)रोजी सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहवयास मिळाली महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. पंरतु या बाबत प्रशासकीय अधिकारी यांचे लक्ष नसल्याने या भागात अनेक दुकाने सुरु होती.तर पवनानगर चौकामध्ये बिनधास्त फिरणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत होती.परिसरातील हाँटेल व रेस्टॉरंट यांची रात्री ११ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याचा आदेश असताना पवनमावळ परिसरातील हाँटेल व रेस्टॉरंट बाहेर मध्यपान पार्सल घेण्यासाठी गर्दी दिसत होती.

हाँटेल बाहेर फक्त बँनर बाजी करुन पार्सल चे सोग अनल्याचे दिसून येत आहे. यावर प्रशासकीय अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. तर काले काँलनी येथील बँका बाहेर गर्दी दिसून आली तर किराणा मालाच्या दुकानामध्ये तीन पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी नसावी असा आदेश असताना एक दुकानामध्ये सहा ते सात लोक असल्याचे दिसून येत आहे.

पवनमावळ परिसरात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर संचारबंदी आदेशामध्ये कोण कोणत्या अत्यावश्यक सेवा तर कोणते बंद यामध्ये प्रशासनाचा गोंधळ उडला असल्याचे दिसून येत आहे.यामुळे संचारबंदी फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

Previous articleदहा बेडचे आयसोलेशन सेंटर चालु- सरपंच सुरज चौधरी
Next articleवाघोलीतील कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी