संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय याचा प्रत्यय मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आला – जयंत पाटील

अमोल भोसले,पुणे

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने हे सरकार चालवू असा संकल्प आम्ही केला होता. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संबोधनातून त्याची प्रचिती आली असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे मांडले आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी निर्बंध घालताना शासनाने पहिला विचार गोरगरीबांचा केल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्यावतीने सर्व प्रयत्न केले जात आहे. प्रशासन अहोरात्र काम करत असून आज आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे असे आवाहनही जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करा. आपण कोरोनाची ही साखळी तोडू असा विश्वास असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleचांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे- निखिल कांचन
Next articleपवनमावळ परिसरात डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी