चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे- निखिल कांचन

 अमोल भोसले,उरुळी कांचन

 

कोरोना विषाणूचे सावट आहे. दरवर्षी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी असते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी काही प्रमाणात सामसूम आहे, अर्थात ती आवश्यकच आहे. तरच आपल्याला या विषाणूची साखळी तोडता येईल. ‘दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल’ या बोलाप्रमाणे कोरोनाचं हे मळभ नक्की दूर होईल. परंतु तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं घाबरून जाऊ नका. आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही मात करण्यात आपल्याला यश मिळेल.

 

दिवसेंदिवस ‘कोरोना’ चा वाढत चाललेला आकडा आणि त्यामुळे  समाज मनामध्ये होत जाणारे बदल, खूप निराश करून टाकतात. म्हणून सगळं संपलं आणि आपण विनाशाकडे जात आहोत असं म्हणून कसं चालेल? जगामध्ये एक टक्का जरी चांगुलपणा शिल्लक असला तरी सकारात्मकता जिवंत ठेवणे आवश्यक आहे. कुठून आणायची ही सकारात्मकता? ती विकत घेता येत नाही की, उसनीही आणता येत नाही. तर सकारात्मकता टिकवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही करावे लागेल. जगात वाईट घडतेय म्हणून सतत वाईट जगासमोर आणतानाच, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे असे आवाहन निखिल शिवाजी कांचन यांनी केले.

Previous articleकांद्याचे बी बनवण्यासाठी लावलेल्या डेंगळ्याच्या फुलांची चोरी
Next articleसंत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय याचा प्रत्यय मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आला – जयंत पाटील