कांद्याचे बी बनवण्यासाठी लावलेल्या डेंगळ्याच्या फुलांची चोरी

प्रमोद दांगट

नारोडी ( ता. आंबेगाव ) येथील शेतकरी विजय बबनराव पवार यांच्या शेतात कांदा बी तयार करण्यासाठी लावलेली व पूर्ण वाढ झालेली ५० हजार रुपये किमतीची डेंगळा पिकाची फुले अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना (दि.13)रोजी घडली आहे. या बाबत अज्ञात चोरट्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की शेतकरी विजय बबनराव पवार ( वय 50 रा.नारोडी ता.आंबेगाव पुणे ) यांनी  आपल्या डोब नावाच्या शेतामध्ये कांदा बी तयार करण्यासाठी डेंगळा कांदा पिक लावले होते.त्याची पूर्ण वाढ झाली होती (दि.12) रोजी ते पिकाची पाहणी करून आले होते. ( दि.13)रोजी ते सकाळी साडेसात वाजता शेतामध्ये गेले असता त्यांना शेतात कांद्याच्या बियाने तयार करण्यासाठी लावलेल्या कांद्याच्या पिकाची डेंगळे पिकाची फुले दिसली नाही त्यांनी याबाबत आजूबाजूला पाहणी केली असता ती फुले कुठेही मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कांदा बी चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleमले पिरतीचं गोखरू रुतलं गं …रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Next articleचांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे- निखिल कांचन