मले पिरतीचं गोखरू रुतलं गं …रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अमोल भोसले,उरुळी कांचन

धर्माली क्रियेशन्स या पुणे स्थित प्रॉडक्शन हाऊसचे रोमँटिक गाणे “मले पिरतीचं गोखरू रुतलं गं ” हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मुळात वऱ्हाडी बोलीभाषेत असलेलं हे गाणं एका रस्ता कामगार मुलाच्या प्रेमाचं गाणं आहे. महफील द बँडच्या अक्षय-संगीत यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं संगीत कुमार आणि समृद्धी इंगळे यांनी गायलेलं आहे. याचे निर्माते आहेत धर्मराज पाटील आणि दिग्दर्शक नवनाथ कांबळे.

 

यात प्रमुख भूमिका आहे श्रीकांत गायकवाड आणि अस्मिता देशमुख यांची काही कारणास्तव हे गाणं प्रेक्षकांसमोर येण्यास उशीर झाला पण येताना रसिकांना निश्चितच आवडणार आहे. १५ एप्रिलला धर्माली क्रियेशन्स च्या युट्युब चॅनेल वर आणि १७ एप्रिलला काही टीव्ही चॅनेल्स वर हे प्रदर्शित होत आहे.

 

बऱ्याच सेलिब्रिटीनी हे गाणं पाहून त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या सर्वांना हे गाणं खूपच आवडलेलं आहे. यामध्ये दिग्दर्शक नट प्रविण तरडे, हास्यकलाकार भारत गणेशपुरे, लेखक तेजपाल वाघ यांचा समावेश आहे. याशिवाय, विशाखा सुभेदार, अनिल नगरकर, दिग्दर्शक प्रकाश पवार यांनीही हे गाणं पाहून उत्तम प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पूर्व विश्वसुंदरी युक्ता मुखी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीबळ सुद्धा गोखरू गाणं पाहून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तरी सर्वांनी हे गाणं पहावं आणि संपूर्ण गोखरू टीम ला प्रोत्साहित करावं. शिवाय, धर्माली क्रियेशन्स च्या युट्युब पेज ला सबस्क्राईब करायला विसरु नये.

Previous article‘अधिस्वीकृती’ म्हणजे पत्रकारितेचा ‘पासपोर्ट’ नव्हे – एस.एम.देशमुख
Next articleकांद्याचे बी बनवण्यासाठी लावलेल्या डेंगळ्याच्या फुलांची चोरी