व्हीलचेअरमुळे चौदा वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो- सुदर्शन जगदाळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

गोव्यातील तो चौदा वर्षांपुर्वीचा काळा दिवस मी कधीच विसरु शकत नाही. त्या भीषण अपघाताने माझं चालणं-फिरणं काळाने हिरावून घेतलं.पण तो माझी जिद्द हिरावून घेऊ शकला नाही. त्या अपघातानंतर मला डॉक्टर म्हणाले होते की, ‘सुदर्शन तु तुझ्या पायावर कधीच उभा राहू शकणार नाही. ’  डॉक्टरांचे हे शब्द बंदुकीतून निघणाऱ्या गोळीप्रमाणे माझ्या कानावर येऊन आदळले. पण मनातील जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. डॉक्टरांचे ते बोल चुकीचे ठरविण्याचा दृढनिश्चय मनाशी केला होता. या निश्चयाला शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून संसदमहारत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या आशीर्वादाची जोड मिळाली आणि आज मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो आहे. मी चौदा वर्षांपुर्वी माझ्या नियतीशी जणू एक करार केला होता, तो केवळ खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मदतीमुळे पुर्ण होऊ शकला. ‘अटोमॅटीक स्टँडींग व्हीलचेअर’ चा शोध माझ्यासारख्या असंख्य गरजूंना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी क्रांतीकारक ठरतोय. ही माहिती मिळाल्यानंतर ही व्हिलचेअर घेण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु या व्हिलचेअरचा खर्च मला झेपणारा नव्हता. याबाबत मी खासदार सुप्रिया सुळे यांच्या शब्द टाकला.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या शब्दाला तातडीने प्रतिसाद देत ताई म्हणाल्या की, ‘सुदर्शन माझ्यातर्फे तुम्हाला हवी असलेली व्हीलचेअर मी देते, फक्त एकदा सतिश पवार यांच्याशी व्हीलचेअरच्या फीचर्स बद्दल बोलून घ्या.’ ताईंच्या सुचनेनुसार मी सतिश पवार सर यांच्याशी संपर्क केला. त्यांना संबंधित व्हीलचेअरचे फीचर्स आणि इतर बाबतीत कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी सर्व तांत्रिक फिचर्स विस्ताराने समजून घेतले आणि विजय कान्हेकर सर यांच्याशी संपर्क करून दिला.यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली व अवघ्या सात दिवसांतच मला अत्यंत आवश्यक असलेली आणि माझ्या हालचालीसाठी वरदान ठरणारी ‘अटोमॅटीक स्टँडींग व्हिलचेअर’ घरपोच मिळाली. या व्हीलचेअर मुळे मी तब्बल चौदा वर्षानंतर माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो.
माझ्यासारख्या साध्या व अतिशय सामान्य कार्यकर्त्याची देखील अडचण समजून घेऊन ताईंनी मला मदत केली. त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे व माझ्या कुटुंबियांकडे शब्द नाहीत.ताई, नियतीशी केलेला करार आज केवळ तुमच्यामुळे पुर्ण झालाय याचा मला मनापासून आनंद आहे.
पक्षातील अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मदतीसाठी क्षणाचाही विलंब न करता धावून जाणारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारखे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे भाग्य आहे. अत्यंत संवेदनशील कार्यक्षम संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे मला बहुमूल्य मदत केल्याबद्दल विशेष आभार मानतो.
 सतिश पवार , विजय कान्हेकर तसेच ताईंची सर्व टीम यांनी केलेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल जगदाळे परिवाराने विशेष ऋण व्यक्त केले.

Previous articleखोटे नाव वापरून व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर जेरबंद
Next articleअरूण पाटे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल