यात्रे निमित्त गावाने केले रक्तदान,वेताळे गावचा अनोखा उपक्रम

राजगुरूनगर- श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त आदर्शगाव वेताळे व पुणे जिल्ह्यात सामाजिक काम करणारी अग्रगण्य संस्था हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यावेळी लायन्स क्लब आकुर्डी यांच्यावतीने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक राहुल बोंबले सरपंच सविताताई बंडू बोंबले माजी सरपंच विठ्ठल बोंबले उपसरपंच योगेश ज्ञानेश्वर बोंबले व सदस्य बाबाजी वाळुंज रेखा बाबासो राव व ग्रामस्थांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोविड काळात प्रथमच यात्रेनिमित्त “रक्तदान शिबीर” आयोजित केले होते. गावातील एकूण “५६” जणांनी रक्तदान करून श्रेष्ठदानाचा लाभ घेतला. इतर गावांना नवीन आदर्श घालून देणाऱ्या “आदर्श गांव वेताळे” येथील ग्रामस्थांच पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

माणुस मृत्यू पावल्यानंतर आपण त्यासाठी काहीही करू शकत नाही पण जिवंत असताना त्याला वाचवण्यासाठी काही तरी नक्कीच प्रयत्न करू शकतो ही भावनिक साद आणि त्याला ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले.गावातील इच्छुक कार्यकर्ते रक्तदात्यांना रक्तदान करायची मनापासून इच्छा होती पण त्यांचे हिमोग्लोबिन काही रक्तदात्यांनी कोरोना लस घेतली असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही.

हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, राजगुरुनगर कडून कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक रक्तदात्यास “वाफेचे मशीन” भेट देण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संचालक सुनील वाळुंज, दिलीप होले, अमर टाटिया, सचिन वाळुंज, उत्तम राक्षे, लायन्स क्लबचे दिलीप बोंबले माजी सरपंच बंडोपंत बोंबले व शिव समर्थ मित्र मंडळ संघर्ष मित्र मंडळ हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. सूत्रसंचालन रोहन बोंबले व आभार आकाश बोंबले यांनी मानले.

Previous article सहकारी संस्थाच्या निवडणूकांना पुन्हा ऑगस्ट अखेरपर्यंत स्थगिती
Next articleखोटे नाव वापरून व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर जेरबंद