कोव्हीड सेंटरचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उदघाटन

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.

हवेली तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी स्वतः लक्ष घालून व हवेलीचे उपविभागीय आधिकारी सचिन बारवकर , अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी शासनाकडून तात्काळ कोव्हीड सेंटरला मंजुरी घेऊन कदमवाकवस्ती येथील एम आय टी कॉलेजच्या वसतिगृहात हे कोव्हीड सेंटर सुरु केले आहे.
कोव्हीड सेंटरचे उदघाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, वैद्यकीय आधिकारी दगडु जाधव, जि.प.सदस्या अर्चना कामठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, अनिल टिळेकर, माजी सरपंच नंदकुमार काळभोर, प्रितम काळभोर, पांडाशेठ काळभोर, रमेश मेमाणे, आदी उपस्थित होते.

Previous articleकडधे,करुंज भागात लाँकडाऊन ला केराची टोपली..
Next articleउद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले बाजार शेड बनले दारूड्यांचा अड्डा