कडधे,करुंज भागात लाँकडाऊन ला केराची टोपली..

पवनानगर -जगभरात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातला असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने नियमावली तयार करुन ३० एप्रिल पर्यंत विकेड लाँकडाऊन लागू केले आहे. यानुसार शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापर बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. तर इतर दिवशी संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

पंरतु पवनमावळ परिसरातील कडधे,करुंज,बौर व थुगांव या भागामध्ये अनेक छोटेछोटे व्यवसायक आदेशाचे पालन करतांना दिसत नाही हा परिसर कामशेत व वडगांव पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असल्याने या भागा मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

तसेच पवनानगर बाजारपेठ मध्ये कडोकोट आदेशाचे पालन करुत अत्यावंशक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.या वेळी लोणावळा ग्रामीण पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मावळ तालुका मार्गदर्शकपदी हभप शांताराम ढाकोळ
Next articleकोव्हीड सेंटरचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उदघाटन