अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मावळ तालुका मार्गदर्शकपदी हभप शांताराम ढाकोळ

पवनानगर- अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मावळ तालुका मार्गदर्शक पदी हभप शांताराम सदाशिव ढाकोळ रा. सदापुर यांची नुकतीच निवड करण्यात आली. वारकरी सांप्रदायातील घनिष्ठ संबंध आणि योगदान तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळावर असणारी निष्ठा आणि कार्य करण्याची तळमळ पाहून पुणे जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांचे विचारांनी प्रेरित होऊन,आणि मंडळाचे संघटन,आचार, विचार, नियमावली तसेच मावळ तालुक्यात पुणे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीत काम करत असलेले मंडळाचे पदाधिकारी यांचे वारकरी संप्रदायातील कार्य आणि योगदान यामुळे अखिल भारतीय वारकरी मंडळात काम करण्याची प्रेरणा मिळाली मी इतर कोणत्याही वारकरी संघाबरोबर काम करत नसुन अखिल भारतीय वारकरी मंडळा बरोबरच काम करणार असल्याचे मत निवडी प्रसंगी बोलताना ढाकोळ महाराज यांनी व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्हा सहसचिव दिनकर निंबळे, कोषाध्यक्ष भरतजी वरघडे गुरुजी, दत्ता महाराज शिंदे, शंकरमहाराज बोंबले, नारायणजी ढोरे महाराज उपस्थिती होते.

Previous articleकर्तव्यात कसूर केल्याने पारगाव शिंगवे येथील पोलीस पाटलाला केले निलंबित
Next articleकडधे,करुंज भागात लाँकडाऊन ला केराची टोपली..