पत्रकार सुभाष भोर यांचे निधन

नारायणगाव ,किरण वाजगे

जुन्नर तालुका पत्रकार संघाचे माजी सचिव व दैनिक नवाकाळचे प्रतिनिधी सुभाष शांताराम भोर (वय ३९ रा. येडगाव, ता. जुन्नर) यांचे (दि १०) रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकाराच्या तिव्र धक्याने दुःखद निधन झाले. कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते
त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात अनेकांनी हळहळ व्यक्त केली . ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

Previous articleगावठी पिस्तूल व काडतुसासह एक जण जेरबंद
Next articleनिधन वार्ता:दौलतराव खैरे यांचे निधन