पवनानगर येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश कालेकर यांच्या वतीने ५ हजार मास्क’चे वाटप

 मावळ तालुक्यातील पवनानगर हि बाजारपेठ ४२ गावाची असून या मध्ये परिसरातील व ग्रामीण भागातील अनेक नागरिक दळणवळण व इतर कामासाठी पवनानगर बाजापेठेत येत असतात कोरोना १९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी तसेच पवनानगर भागात मोठ्या प्रमाणावर रुग्नाची संख्या वाढताना दिसत आहे.

कोविड १९ रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पवनानगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कालेकर यांच्या माध्यमातून पवनानगर बाजारपेठेतील नागरिकांना ५ हजार मास्क चे वाटप करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सहकारी बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र,तलाठी कार्यालय, पोस्ट कार्यालय,वीट भट्टी वरील आदिवासी बांधवांना पोलिस स्टेशनमध्ये मास्क वाटप करण्यात आले कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

Previous articleराहुरीतील पत्रकार हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून काढा एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleखंबाटकी घाटात ट्रक व चारचाकी मोटार जळून खाक