नारायणगाव येथील वाईन शॉप चालकावर गुन्हा दाखल

किरण वाजगे, नारायणगाव – येथील खोडद रोडवर असलेल्या शेरकर वाईन शॉप या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये बेकायदा गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे वाईन शॉप चालक गुरुकांत श्यामलाल यादव (वय ३७, राहणार पाटे आळी, नारायणगाव) याच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८,२६९, साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४ यानुसार नारायणगाव पोलीस स्थानकात मंगळवार (दि. ६) रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण वसंत लोहोटे यांनी नारायणगाव पोलिसात दिली आहे. दरम्यान शेरकर वाईन शॉप या दुकानासमोर प्रमाणापेक्षा खूप जास्त गर्दी केल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous articleजेसीबी मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक
Next articleराहुरीतील पत्रकार हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून काढा एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी