पिंपरी’बु”मध्ये पहिल्याच दिवशी ३४७ नागरिकांचे लसीकरण

चाकण- पिंपरी बु, गावामध्ये कोविड १९ मोफत लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या लसीकरणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, एकुण ३४७ जणांनी पहिल्या दिवशी लस घेतली. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर, प्राथमिक उपकेंद्र पिंपरी बु, श्रमसाफल्य प्रसारक मंडळ पिंपरी बु || व ग्रामपंचायत पिंपरी बु यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले.

यावेळी तलाठी व्ही. व्ही. मुंगारे, सरपंच देऊबाई मोहन वाळुंज, प्राध्यापक सोमवंशी सर, पोलिस पाटील रविंद्र सदाशिव ठाकुर, माजी सरपंच कैलासराव ठाकुर, रखमा शेट वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य धोंडिबा बजाबा वाळुंज, गणेश हुंडारे, सुधा रामदास भुजबळ, आशा दुर्गेश भोसले, ग्रामसेवक शेलार भाऊसाहेब, अशोक बन्सु ठाकुर, बाळासाहेब ठाकुर, द्वारकानाथ ठाकुर, सर्जेराव हुंडारे, शंकर ठाकुर, शांताराम ठाकुर इत्यादी उपस्थित होते.


गावच्या अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थांनी लस घेऊन या लसीकरणाचा शुभारंभ केला. हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विकास दादा ठाकुर, श्रमसाफल्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बाबाजी ठाकुर व पिंपरी उपकेंद्रांच्या वतीने डाॅ रजनी कातोरे व डाॅ योगेश रसाळ यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी देण्यात आली होती. या संपुर्ण लसीकरणावर वैद्यकीय अधिकारी डॉ पुनम चिखलीकर व डाॅ एस. आर. मोरे हे प्रामुख्याने लक्ष ठेवून होते. आजच्या संपूर्ण लसीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय होती. या लसीकरणामध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आरोग्य केंद्र आशावर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षण संस्थेचे शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleदिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट
Next articleस्कॉटीश कड्यावर फडकावला तिरंगा