राज्यातील तरुणाईला रा.यु.कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांची रक्तदानासाठी हाक

अमोल भोसले,पुणे

  राज्याला रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतो आहे. राज्यभरात रुग्णांना रक्ताची गरज भासते आहे.अशावेळी आपण केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकतो यापेक्षा जास्त पुण्याईचे काम ते कोणते असणार आहे..?”अशी विचारणा करतानाच राज्यातील तरुणांनी रक्तदान करावे अशी हाक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घातली आहे.  याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील BloodforMaharashtra हे अभियान राबवण्यासाठी पुन्हा एकदा नव्या दमाने सज्ज व्हावे असे आवाहनही महेबूब शेख यांनी केले आहे.

मागील वर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाला आणि राज्यात अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवू लागला होता. रक्ताची मोठी गरज असल्याच्या बातम्या राज्यातून अनेक ठिकाणाहून येवू लागल्या. रक्ताचा हा तुटवडा लक्षात घेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने “ मी रक्तदान करणार माझ्या एका भावाला जीवनदान देणार” हे अभियान राबवुन आपल्या पदाधिकाऱ्यांना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते त्यावेळी या आवाहनानंतर संपूर्ण राज्यातून आपल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मिळून तब्बल १५ हजार २०० बाटल्या रक्त गोळा केले होते अशी माहितीही महेबूब शेख यांनी यावेळी दिली.

आज पुन्हा राज्यात रक्ताचा तुटवडा भासतो आहे.आपल्या राज्याकडे केवळ पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्त पुरवठा शिल्लक आहे. आज देशाचे नेते शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर महेबूब शेख यांनी फक्त राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांना आवाहन केले नाही तर राज्यातील प्रत्येक युवकाला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. शक्य असल्यास आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे.आज आपल्या राज्याला रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतो आहे अशी हाकही दिली आहे. लवकरात लवकर हा उपक्रम राज्यात सुरू करत असल्याचे सांगतानाच आपण सर्वजण मिळून या मोहिमेला मोठे यश मिळवून देवू शकतो असा विश्वास महेबूब शेख यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे.

Previous articleविहिरीत पडलेल्या बिबट्याचे वाचवले प्राण ; वनविभागाच्या प्रयत्नांना यश
Next articleदिवसभर राज्यात पत्रकारांच्या अनोख्या आंदोलनाचीच चर्चा पत्रकारांच्या ‘मेल पाठवा” आंदोनलनास राज्यात उदंड प्रतिसादः एस.एम.देशमुखांनी मानले आभार