“माणुसकीची नाळ” हा उपक्रम कौतुकास्पद- सहा.पो.नि पवन चौधरी

अमोल भोसले, उरळी कांचन

देशाचा सेवक म्हणून काम करतानी काही निर्णय कडक घ्यावे लागतात, तसे लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत उरुळी कांचन पोलीस चौकी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना खुप काही शिकायला मिळाले. आज शेवराई सेवाभावी संस्थेच्या वतीने ऊरुळी कांचन येथे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी “मानुस्कीची नाळ “या उपक्रमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस हवालदार सचिन पवार, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस हवालदार गायकवाड, यांचा सन्मान करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी म्हणाले आपण बारकाईने जर विचार केला तर, मृत्यू जेव्हा येतो तेव्हा गरीब श्रीमंत काहीच बघत नाही. श्रीमंत असो व गरीब, नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता, साहेब असो व नोकर या मृत्यु पुढे सगळे जन शुन्यप्रमाणे आहे. म्हणून सांगतो मित्रांनो आताचा काळ हा खूप वाईट आहे परिस्थिती बिकट आहे. मृत्यु कधी कुठून आणि कसा येईल सांगता येत नाही , म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा, रुसने ,फुगणे, दुश्मनी ठेवणे, घमंडी पणाने वागून इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टी सोडून द्या. आणि जो काही काळ आहे तो सर्वांशी आपुलकीने वागा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण कोरोना महामारीमध्ये आपण जर काहीच शिकलो नाही. तर मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे म्हणून आपल्याकडे किती पैसा आहे.सोने चांदी आहे हे सर्व सोडूनच जावे लागते, एरव्ही मर्सिडीज, बिएमडब्लू गाडीमधे फिरणा-ला मृत्यूनंतर मुन्सिपाल्टीच्या गाडीतूनच स्मशानापर्यंत जावे लागते.
पण , पैसा, प्रॉपर्टी सर्व सर्व इधेच सोडून जावे लागते. हे सगळं अंगावरच पाणी आहे. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा, प्रेम द्या प्रेम घ्या आपली काळजी आपणच घ्या.आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, यांच्या संकल्पनेतून पोलीस हा आपलाच कोणीतरी जवळीक आहे व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आपण देखिल सहकार्य करणे गरजेचे आहे. या विचाराने बदलुन जाणा-याचा सन्मान आणि नविन येणा-यांच स्वगत या विचाराने “मानुस्कीची नाळ” या उपक्रमातून प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस चौकीचे पोलीस स्टाप यांचा सन्मान जेष्ठ साहित्यिक भास्कर भोसले तसेच उरुळी कांचनचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र (फरींदा) टिळेकर यांच्या हास्ते करण्यात आला.

या वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले,राजेंद्र भगवान कांचन, सचिन टिळेकर, मा. होले, स्वप्रित भोसले, गौरी नामदेव भोसले, शोभा भास्कर भोसले, ऋतुजा उपस्थित होते.

Previous articleरेस्टॉरंट व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची योग्य संधी देण्याची प्रियांक शाह यांची मागणी
Next articleकोरोना’ प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा