रेस्टॉरंट व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची योग्य संधी देण्याची प्रियांक शाह यांची मागणी

पुणे:- पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . बिबेवाडी- कोंढवा येथील प्रसिद्ध हॉटेल गोकुळ रेस्टॉरंटचे मालक प्रियांक शाह या निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याविषयी बोलताना प्रियांक शाह म्हणाले, “मागील वर्षभरात लॉकडाऊनचा परिणाम म्हणून शहरातील ४० % रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सुरु आहेत त्यांचा ५०% सुद्धा व्यवसाय होत नाहीये. अशा परिस्थितीत आणखी ७ दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. इतर व्यापार, भाजीमंडई, दुकाने सुरु असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे.”
तसेच हॉटेल व्यवसायावर अनेकांचे पोट भरत असते.

उदाहरणार्थ हॉटेल मध्ये काम करणारे वेटर, आचारी, डिलिव्हरी बॉय , त्याच प्रमाणे हॉटेल व्यवसायावर किराणा दुकान, भाजी विक्रेता, डेअरी, उत्पादक आदींचा हि व्यवसाय अवलंबून असतो . त्या मुळे हॉटेल व्यवसायिकांना या निर्बंधातून सूट देण्यात यावी अशी मागणी प्रियांक शाह यांनी राज्य सरकार आणि प्रशासनसकडे केली आहे. हॉटेल व्यवसाय टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावा. पुणे शहरात सुमारे दहा ते बारा हजार हॉटेल व्यावसायिक आहेत. या निर्णयामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि यांच्या सोबत जोडले गेलेल्या व्यक्तींवर उपास मारीची वेळ येईल .

कोरोनाची वर्षभरातील परिस्थितीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन संपला तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे देखील शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी या वेळी प्रियांक शाह यांनी केली.

Previous articleशिरूर तालुक्यातील बारा गावे राहणार सात दिवस बंद
Next article“माणुसकीची नाळ” हा उपक्रम कौतुकास्पद- सहा.पो.नि पवन चौधरी