शिरूर तालुक्यातील बारा गावे राहणार सात दिवस बंद

प्रतिनिधी शिरूर

गेल्या काही दिवसात शिरूर तालुक्यात कोरोणा रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना आजाराचा फैलाव वाढू नये म्हणून शिरूर तालुक्यातील मुख्य गावातील जास्त रुग्ण आढळलेल्या 12 गावे दि.3 एप्रिल ते दि.9 एप्रिल पर्यत पुढील सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असुम त्या संबंधित सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित आरोग्य विभाग तालुका विभाग आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना दिल्या आहे.

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा 14, शिरसगाव काटा 12, न्हावरा 35, आंबळे 6, चिंचणी 10, आंधळगाव 11, निमोणे 9,टाकळी हाजी 16, आमदाबाद 9, निमगाव म्हाळुंगी 15 ,पाबळ 14 ,जातेगाव बुद्रुक 16, ही गावे बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा किराणा दुकाने वैद्यकी आस्थापना दूध संकलन केंद्र बँक खताचे दुकाने सुरू राहतील तसेच शेती विषयक सर्व कामे सामाजिक अंतर आणि नियम पाळून सुरू राहतील. बंद कालावधीत या गावातील आजूबाजूचा पाच किलोमीटरचा परिसर हा बफर क्षेत्र म्हणून घोषित केला असून या परिसरात विनाकारण फिरणाऱ्यावर ,गर्दी जमविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Previous articleकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम कोरोटाईन टाळावे – तहसीलदार रमा जोशी
Next articleरेस्टॉरंट व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची योग्य संधी देण्याची प्रियांक शाह यांची मागणी