आंबेगाव तालुक्यात २३ हजार १५० नागरिकांचे लसीकरण

सिताराम काळे

आंबेगाव तालुक्यात कोव्हिड – १९ च्या पार्श्वभूमिवर दि. २९ मार्च पर्यंत २३ हजार १५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

तालुक्यातील साठ वर्षांवरील नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारने निर्धारित केलेल्या २० आजारांपैकी कोणताही आजार असल्यास ऑनलाईन नोंदणी करू शकतात. लसीकरणाला जाताना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, चालक परवाना, पॅनकार्ड आदि कोणतेही ओळखपत्र घेवून नागरिकांनी लसीकरणास जावे. जर गंभीर आजार असेल तर वैदयकीय प्रमाणपत्र सोबत घेवून जावे.

तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालय मंचर, ग्रामीण रूग्णालय घोडेगाव, गेटवेल हॉस्पिटल मंचर, भिमाशंकर हॉस्पिटल व आठ प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. दि. २९ पर्यंत याठिकाणी उपजिल्हा रूग्णालय मंचर येथे ७ हजार ९५५ नागरिकांनी, ग्रामीण रूग्णालय घोडेगाव २ हजार ७६४, गेटवेल हॉस्पिटल मंचर ३४७, भिमाशंकर हॉस्पिटल १२८, प्राथमिक आरोग्य केंद्रातील तळेघर येथे ७२२, नागरिकांनी, अडिवरे येथे ३२७, डिंभे २ हजार ५२१, महाळुंगे पडवळ २ हजार, लांडेवाडी ७९६, पेठ १ हजार ३६५, निरगुडसर २ हजार ४३९, धामणी येथे १ हजार ७८६ असे एकंदरीत २३ हजार १५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

Previous articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव बाजारपेठेतील उलाढाल मंदावली
Next articleसामाजिक कार्यकर्ते गौतमराव खरात यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर वाघमारे यांनी लिहिलेला हृदयस्पर्शी लेख