कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव बाजारपेठेतील उलाढाल मंदावली

 सिताराम काळे

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव बाजारपेठ ही परिसरतील हक्काची आर्थिकदृष्टया नावाजलेली पेठ आहे. बारा वाडया व तेरावे घोडेगाव असलेल्या वाडयावस्त्यांचा बाजारहाट हा या बाजारपेठेतून होतो. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे.

राजा हरिश्चंद्राचे वरदान लाभल्याने घोडेगाव परिसर हा पूर्ण बागायती पट्टा आहे. त्यामुळे शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर येथील परिसराचे अर्थकारण अवलंबून आहे. तसेच घोडेगाव मध्ये तहसिल कार्यालय, भुमिअभिलेख, दु्ययम निबंधक, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, न्यायालय, पंचायत समिती आदि कार्यालय असताना देखील कोरोनाच्या साथीमुळे आलेली मरगळ, बाजारपेठेत दिसून येत आहे. शेतक-यांची उलाढाल आता मंदावली आहे. शासनाच्या नियमांनुसार विवाह सोहळे आटोपून घेत आहे. त्यामुळे एैन लग्नसराईत देखील बाजारपेठेत गर्दी जाणवत नाही. लग्नसराईत येथील बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. ती आता वर्षभरापासून थांबलेली आहे.

कोरोना साथीची टांगती तलवार अजून डोक्यावर असल्याने पुढचे दिवस कसे असतील याचा अंदाज येत नाही. त्यामुळे शेंतकरी, नागरिक मोठया खर्चासाठी हात आखडता घेत आहेत. त्यात महावितरणने याच काळात थकीत वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. विज तोडणीच्या भीतीने शेतकरी विज बिल भरू लागला आहे. तर 31 मार्च पर्यंत बॅंकेचे, सोसायटीचे शेतकरी कर्ज भरणे. एकंदरीत ग्रामीण भागात शेतक-यांच्या खिशात पैशाचा खळखळाट असेल तरच बाजारपेठेत खरेदीचा सुळसुळाट असतो. मात्र कोरोनाने घोडेगावची बाजारपेठ ग्राहकांअभावी मंदावली आहे.

Previous articleजवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सागर उढाणे ला यश
Next articleआंबेगाव तालुक्यात २३ हजार १५० नागरिकांचे लसीकरण