महावितरणच्या अधिका-यांसोबत आमदार अशोक पवार यांची बैठक संपन्न

गणेश सातव,वाघोली—प्रतिनिधी

वाघोली येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत त्या अनुषंगाने वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन यांनी समस्या कायमस्वरूपी कशा प्रकारे सोडवता येतील सविस्तर अभ्यास करून विस्तृत निवेदन तयार करून आमदार अशोक पवार उपस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कार्यकारी अभियंता महावितरण रवींद्र बुंदेले
उपविभागीय कार्यकारी अभियंता महावितरण अमित भरते, सहाय्यक अभियंता महावितरण गणेश श्रीखंडे,
कुंभार सर, कार्यकारी अभियंता पीएमआरडीए अमित हसापे, कनिष्ठ अभियंता पीएमआरडीए प्रमोद बाबरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण योगेश सूर्यवंशी, वाघोली ग्रामस्थ भूषण कुलकर्णी वाघोली ग्रामस्थ यांच्या उपस्थिती मुख्य अभियंता यांचे कार्यालय रास्ता पेठ पुणे येथे वाघोली येथील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत चर्चा झालेले मुद्दे “मला वाघोलीचे चित्र बदलायचे आहे त्यासाठी काय लागेल ती मदत मी करायला तयार आहे” अशा शब्दात आमदार अशोक पवार यांनी बैठकीला सुरवात केली.१३२ केवी स्वतंत्र उपकेंद्र वाघोली ला मिळण्याबाबत प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आलेला आहे हे उपकेंद्र मंजूर झालेले आहे फक्त तो खर्च एम एस ई बी ने करायचा की पंचशील ने त्याबाबतचे दोघांची एकत्रित मीटिंग घ्यायची आहे त्यावर निर्णय सदर बाबतीत मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून हा विषय मार्ग काढणार असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले सदर स्वतंत्र उपकेंद्र “EON-वाघोली” हे कार्यरत झाल्यास वाघोली येथे अखंड विद्युत पुरवठा करणे शक्य होईल. लोणीकंद येथून पूर्वरंग सब स्टेशनला स्वतंत्र इन्कमर लाईन टाकण्याचे सुरू आहे परंतु काही ठिकाणी स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडले आहे यापूर्वी मी पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांची मदत घेऊन बरेचसे काम करून घेतले आहेत तरीसुद्धा काही ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे लाईन टाकने शक्य झालेले नाही असे अमित भरते यांनी सांगितले त्यावर आमदार अशोक पवार पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांना फोन करून लाईन टाकण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे असे सांगितले. यावर अमित भरते यांनी आमदारांचे आभार मानत उर्वरित काम पाऊस कमी झाल्यावर पूर्ण करून घेऊ असे सांगितले. ह्या इन्कमर लाईन मुळे बॅक फिडिंग करणे शक्य होईल
सद्यस्थितीत वाघोली शाखे मध्ये ६०२०३ ग्राहक आहेत त्या तुलनेत फक्त २३ कर्मचारी आहेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे होत असलेली अडचण लक्षात घेता तात्काळ शक्य तेवढा जास्त कर्मचारी वर्ग वाघोली येथे नियुक्त करण्यात यावा अशा सुचना आमदार अशोक पवार यांनी रवींद्र बुंदेले यांना दिल्या.
वाघोली शाखेचे तीन शाखेत विभाजन होणे आवश्यक आहे त्यामुळे ८० कर्मचारी व तीन स्वतंत्र अभियंते वाघोली गावासाठी मिळतील त्यामुळे त्यामुळे कामकाज सोपे होईल विभाजन होईपर्यंत कमीत कमी ३५ कर्मचारी वाघोली शाखेला देण्यात यावे अशी विनंती वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन तर्फे करण्यात आली होती यावर उत्तर देतांना रवींद्र बुंदिले यांनी महावितरणच्या वरिष्ठ पातळीवर यासाठी प्रयत्न आमदार अशोक पवार यांनी करावे अशी विनंती केली ही विनंती मान्य करत आमदार पवार यांनी लवकरात लवकर वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन वाघोलीचे तीन शाखेमध्ये विभाजन करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.शिरूर च्या धर्तीवर वाघोली साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक घेणार असे आमदार पवार यांनी सांगितले.
उपकार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता यांनी काही समस्या असल्यास प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क करावा असे आमदार पवार यांनी सांगितले.

वाघोली साठी स्थायी स्वरूपी स्वतंत्र मेंटेनन्स एजन्सी ची नियुक्ती करण्यात आली आहे ती लवकरच वाघोली येथे कार्यरत होईल यामुळे वाघोली येथे लाईन मध्ये बिघाड झाल्यास तात्काळ मेन्टेनन्स टीम तिथे पोहोचून योग्य तो दुरुस्ती करू शकेल अशी माहिती बुंदेले दिली.
महावितरण तर्फे लाईनचे जॉइन्ट्स घट्ट करण्यात येतील.
डिओ स्विच बसविल्यास विशिष्ट सोसायटीची लाईट गेल्यास फिडर बंद न करता काम करणे शक्य होईल त्यामुळे सोसायटीच्या लाइन ला बसविण्याचे काम महावितरण तर्फे करण्यात यावे असे निवेदन करण्यात आले होते त्यावर उत्तर देताना बुंदेले म्हणाले की मेन्टेनन्स करताना सदर बसविण्याचे काम करून घेऊ.
सोसायट्यांनी आपल्या परिसरातील ट्रांसफार्मर च्या आसपासचा परिसरात स्वच्छता ठेवणे, झाडे, गवत इत्यादी उगवल्यास ते कापणे तसेच कचरा इत्यादी ट्रांसफार्मर शेजारी गोळा न करणे इ काळजी घेऊन महावितरण ला सहकार्य करावे असे महावितरण तर्फे विनंती करण्यात आली.

वाघोली येथील महावितरणचे कार्यालय लवकरच नवीन इमारतीत स्थानांतरित करण्यात यावे काही अडचण असल्यास प्रत्यक्ष आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क करावा असे स्वतः आमदार पवार यांनी सूचना दिल्या.
नगर रोड रस्ता दरम्यान गाडल्या गेलेल्या उच्च दाब वीज वाहिन्या संदर्भात पीएमआरडीए मुख्य अभियंता कुंभार यांच्यासोबत अमित भरते यांनी सविस्तर चर्चा केली. अमित भरते यांनी आमदार पवार यांना सांगितले की पीएमआरडीए सोबत या विषयावर आतापर्यंत चार वेळा पत्रव्यवहार झालेला आहे परंतु आतापर्यंत ह्यावर PMRDA कडून ठोस प्रतिक्रिया किंवा कार्यवाही झालेली नाही. अमित भरते यांनी विषयाचे गांभीर्य आमदार पवार यांना सविस्तर समजावून दिले जसे की उच्च दाब वाहिन्या जमिनीत गाडले गेले असल्यास व बिघाड झाल्यास तो दुरुस्त करताना अनेक तांत्रिक अडचणी उद्भवतील तसेच नगर रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता असून प्रचंड वर्दळ असते तसेच जोपर्यंत या गाडल्या गेलेल्या वाहिन्या स्थलांतरीत करण्यात येत नाहीत तोपर्यंत अन्य कुठल्याही प्रकारचे स्थलांतरणा चे काम करणे योग्य ठरणार नाही तसेच सध्या आहे त्या परिस्थितीत पीएमआरडीए नी काम सुरू केल्यास आणि बिघाड उद्भवल्यास सुमारे ४०००० वीज ग्राहक प्रभावित होतील त्यामुळे जनक्षोभ निर्माण होण्याची ची दाट शक्यता आहे.

सदर विषय आमदार पवार यांनी शांतपणे ऐकून घेतला त्यानंतर श्रीयुत अमित भरते यांना नवीन केबल टाकण्यास किती खर्च येईल असे विचारले त्यावर अमित भरते यांनी महावितरणच्या कार्यालयाने रिवाईज इस्टिमेट एक कोटी साठ लाख रुपयांचे दिलेले आहे अशी माहिती दिली, त्यानंतर आमदार पवार यांनी पीएमआरडीए आयुक्त कुमार यांना फोन द्वारे याबद्दल तात्काळ माहिती दिली व व गरज पडल्यास दुसरी टेंडर काढावे किंवा हे टेंडर रिवाईस करावे अशी विनंती केली.
सदर चार उच्चदाब वीज वाहिन्या वाघेश्वर चौकात दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामात सात ते आठ फूट जमिनीत गाडल्या गेलेल्या आहेत ह्या पुढील सर्व सोसायट्यांना वीजपुरवठा करतात.
उद्या दिनांक 9July2020 रोजी श्री कुंभार साहेब हे शाखा अभियंता यांच्या सोबत सदर स्थळाची पाहणी करणार आहेत.

लॉक डाउन मूळे अतिरिक्त विजेची बिले आलेली आहेत त्यासंदर्भात शंकासमाधान तसेच समस्या निवारण कक्ष वाघोली मध्ये देण्यात यावा तसेच वाघोली येथील विविध सोसायट्यांमध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी वाघोली हाउसिंग सोसायटीच्या वतीने करण्यात आली होती त्यावर उत्तर देताना भरते यांनी अशा प्रकारची व्यवस्था महावितरण तर्फे आधीच करण्यात आलेली आहे असे सांगितले. आमदार अशोक पवार यांनी अनेकांना सरासरीपेक्षा फारच अधिक रकमेची बिलं आलेली आहेत व सर्वसाधारण वीज वापर केला असताना सुद्धा इतक्या अधिक रकमेचे बिल येणे अशक्य आहे असे सांगितले त्याला उत्तर देताना भरते ह्यांनी अशा संदर्भात मीटर रिडींग ची पडताळणी कडून चुकीचे रीडिंग घेतले आहे का किंवा मीटर मध्ये बिघाड आहे का याबाबत चौकशी करावी लागेल असे सांगितले आणि चुकीच्या रीडिंग मुळे जास्त बिल आले असल्यास ते बिल कमी करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Previous articleराजगुरुनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाभिक संघटनेला स्फेटी किट व धान्य वाटप
Next articleअजितदादा पवार यांच्या घोषणेनंतर दोन तासात ‘सारथी’ला मिळाले ८ कोटी रुपये