कांदा विकून आलेले पैसे व गाडी भाड्याचे पैसे घेऊन ड्रायव्हर फरार

मंचर येथील गाडी मालकाची २,८६,००० रुपयांची फसवणूक

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर येथील ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे अनिल फलके यांच्याकडे कामाला असलेल्या ड्रायव्हरने मुंबई येथे व्यापाऱ्यांकडे कांदा खाली करायला जाऊन व्यापाऱ्याकडून कांद्याचे पैसे व गाडीचे भाडे असे २,८६,००० रुपये घेऊन पसार झाला आहे. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आणि चंद्रकांत फलके ( वय ३७ रा. मंचर ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून त्यांच्याकडे असलेल्या एम.एच. ४३ वाय.५९८० या टेम्पोवर नागेश सोपान गायकवाड ( रा. बोरगाव ,ता. लोहा जिल्हा नांदेड ) हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. दिनांक २६ रोजी ड्रायव्हर गायकवाड हा फलके यांच्या टेम्पोत जुन्नर वरून कांदा घेऊन मुंबई विरार येथील अभिषेक ट्रेडर्स या व्यापाऱ्यांकडे खाली करण्यासाठी गेला होता दि. २७ १रोजी त्याने माल खाली केल्याचे व व्यापाऱ्यांने गाडी भाडे व कांदा मालाचे २ लाख ८६ हजार रुपये दिल्याचे फोनवर कळवले.त्यावेळी मालकाने मी बाहेर असल्याने व्यापाऱ्यांनी दिलेले पैसे मंचर येथील घरी देण्यासाठी सांगितले मात्र ड्रायव्हर गायकवाड याने रक्कम घरी दिली नाही व गाडी मंचर येथे बिल्डिंग च्या बाजूला लावून कुठेतरी निघून गेला आहे. त्याला संपर्क केला असता त्याचा फोन बंद होता व त्याचा शोध घेतला असता तो कुठे मिळून आला नाही. त्यानंतर गाडी मालक फलके यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी दि.२९ रोजी ड्रायव्हर नागेश गायकवाड विरोधात मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleचांडोली बुद्रुक मध्ये घोड नदी पात्रात असलेल्या पाण्यातील इलेक्ट्रिक मोटरची चोरी
Next articleबैलगाडीतून लग्नाच्या मांडव डहाळ्याची मिरवणूक काढल्याने दोघांवर गुन्हा दाखल