चांडोली बुद्रुक मध्ये घोड नदी पात्रात असलेल्या पाण्यातील इलेक्ट्रिक मोटरची चोरी

 प्रमोद दांगट

चांडोली बुद्रुक पिंपळाचा मळा येथील घोड नदी पात्रात असलेल्या दहा एचपी पाण्यातील इलेक्ट्रिक मोटरची कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याची घटना दिनांक २/३/२०२१ ते ८/३/२०२१ रोजीच्या दरम्यान घडली आहे. याबाबतची तक्रार शेतकरी कुंडलिक बबन पोखरकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

कुंडलिक पोखरकर यांची चांडोली बुद्रुक पिंपळाचा मळा येथे शेती असून ते दिनांक २ रोजी पाणी भरून घरी आले होते त्यानंतर ते दि.८ रोजी पाणी भरण्यासाठी शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिक केबल कट झालेली दिसली त्यावेळी त्यांनी पाहनी केली असता त्यांना पाण्यात इलेक्ट्रिक मोटर दिसली नाही त्यांनी मोटरचा आजूबाजूला शोध घेतला असता ती सापडली नाही. कुणीतरी अज्ञात चोराणे त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची मोटर चोरल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस नाईक साबळे करत आहे.

Previous articleघोडेगाव हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Next articleकांदा विकून आलेले पैसे व गाडी भाड्याचे पैसे घेऊन ड्रायव्हर फरार