घोडेगाव हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

प्रमोद  दांगट

घोडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोटमदरा फाटा येथे पान स्टॉल टपरी मध्ये व महाराणा चौक घोडेगाव येथे किराणामाल दुकानात अवैधरित्या गुटका ,सुगंधित तंबाखू याची विक्री करणाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग पोलिसांनी कारवाई केली आहे .या कारवाईत टपरी व दुकानातून सहा हजार सहाशे एक रुपये किमतीचा गुटखा ,पान मसाला जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २९/३/२०२१ रोजी खेड विभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांना गुप्त बातमीदारा मार्फत घोडेगाव ता. आंबेगाव च्या हद्दीत कोटमदरा फाटा येथे पान टपरी मध्ये दत्तात्रय मनाची भास्कर ( वय ५५ रा.कोटमदरा फाटा,घोडेगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे ) व घोडेगाव महाराणा चौक किराणा दुकानात अजित महादेव चिलेकर हे गुटख्याचा साठा जवळ बाळगून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली. याबाबत त्यांनी पो. ह. एस.पी.मुळूक, पो.कॉ. आर.बी.डांगे ,पो. कॉ. फिरोज मोमीन यांना सदर घटनेची माहिती देत त्या ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले असता पथकाने घोडेगाव पोलीस स्टेशन येथून दोन पंच घेऊन सदर ठिकाणी छापा मारला असता कोटमदरा फाटा येथील टपरी मध्ये ३,६६६ रुपये किमतीचा गुटख्याचा साठा सापडला तर महाराणा चा घोडेगाव येथील किराणा दुकानात २,९३५ रुपये किमतीचा साठा मिळून आला याबाबत पो. कॉन्स्टेबल फिरोज मोमीन यांनी गुटखा विक्री करणारे अजित चिलेकर व दत्तात्रय भास्कर यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावर अन्नसुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleनारायणगावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुष्पाताई आहेर यांची बिनविरोध निवड
Next articleचांडोली बुद्रुक मध्ये घोड नदी पात्रात असलेल्या पाण्यातील इलेक्ट्रिक मोटरची चोरी