नारायणगावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुष्पाताई आहेर यांची बिनविरोध निवड

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुष्पाताई आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांनी दिली.

यानिमित्ताने उपस्थितांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच पुष्पाताई आहेर यांचा सत्कार करण्यात आला.

आज ग्रामपंचायत कार्यालयात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच योगेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीच्या बैठकीत सहा महिने कालावधीसाठी ही निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी उपसरपंच सारिका डेरे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांनी आज उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार अर्ज स्विकारुन एकच अर्ज आल्याने सर्वानुमते ही बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे व लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, रोहिदास भुजबळ, ज्येष्ठ शिवसैनिक रशिद ईनामदार, माजी उपसरपंच आशिष माळवदकर, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, संतोष पाटे, मावळत्या उपसरपंच सारिका डेरे, राजेश बाप्ते, रामदास अभंग, रुपाली जाधव, मनिषा मेहेत्रे, कुसुम शिरसाठ, ज्योती दिवटे, अनिता कसाबे, अश्विनी ताजणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, राजु पाटे, विकास तोडकरी, जयेश कोकणे, अनिल दिवटे, मयुर विटे, निलेश दळवी, संतोष बाळसराफ, सचिन खैरे, अजित वाजगे, भाऊ मुळे, भागेश्वर डेरे, हेमंंत कोल्हे, अनिल खैरे, किरण ताजणे, नंदु अडसरे, निलेश जाधव, गौरव खैरे, समीर इनामदार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleनिगडाळे ते भिमाशंकर सात कोटी २६ लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा चुराडा
Next articleघोडेगाव हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई