चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुर्‍हाडीने मारहाण

प्रमोद दांगट

वळती (ता.आंबेगाव )येथील भोकरवस्ती येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला कुर्‍हाडीने गंभीर मारहाण केल्याची घटना (दि.२६ )रात्री रोजी घडली आहे. याबाबत पत्नीने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी महिला तिचा पती रवींद्र शांताराम भांगरे याच्या बरोबर वळती भोकरवस्ती येथे राहत असून त्यांच्यात नेहमी कौटुंबिक विषयावरून भांडणे होत असतात. तसेच फिर्यादीचा पती नेहमी चारित्र्याच्या संशयावरून फिर्यादिस मारहाण करत असतो. (दि.२६) रोजी रात्री नऊ च्या सुमारास रवींद्र भांगरे हा दारू पिऊन घरी आला रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी महिला झोपायची तयारी करत असताना तिच्या मुलाला तू सलमान खान सारखा दिसतोस असे म्हणाली त्यावेळी रवींद्र भांगरे याने पत्नीला हा सलमान खान कोण आहे तुझा व त्याचा काय संबंध असे म्हणून शिवीगाळ करत वाद घातला त्यानंतर ते झोपले असता भांगरे रात्री उठून घराबाहेर जाऊन कुर्‍हाड घेऊन आला व फिर्यादीस तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत कुर्‍हाडीने हातावर,डोक्यात ,व तोंडावर गंभीर मारहाण केली. फिर्यादी महिला आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाली त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांनी तिला रुग्णवाहिका द्वारे रुग्णालयात दाखल केले.याबाबत तिने पती विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.नि.कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर सागर खबाले पुढील तपास करत आहे.

Previous articleनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार-प्रो.उपअधीक्षक मयूर भुजबळ
Next articleचिंचवडचे नुतन पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज यांच्या हस्ते ‘होप’चे मानवतेचे दिप प्रज्वलित