नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार-प्रो.उपअधीक्षक मयूर भुजबळ

दिनेश पवार,दौंड

सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर स्वरूपात नियम करण्यात आले आहे,जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यावर कठोर स्वरूपात कारवाई करण्यात येईल असे मत परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले, सध्या राज्यात कोरोना ची परिस्थिती वाढत आहे .

यावर उपाययोजना तसेच इतर माहिती देण्यासाठी सोमवार ( दि.29 ) रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,यामध्ये जनतेने स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे, जोपर्यंत स्वतःवरती अशी परिस्थिती येत नाही तोपर्यंत व्यक्ती सुधारत नाही,वेळ निघून जाण्याअगोदर सतर्क राहणे गरजेचे आहे, असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मत व्यक्त केले, तालुक्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहेत त्याचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे,तसेच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था,शांतता अबाधित राहण्यासाठी अवैध धंद्यावरती कडक कारवाई करण्यात येईल तसेच बेकायदा जमाव जमवणे,दहशत निर्माण करणे असे प्रकार देखील यापुढे होऊ देणार नसल्याचे तसेच वाहतुकीचे नियम न पाळनाऱ्या वरती देखील कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रो.पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी सांगितले,पत्रकारांनी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या अडचणी मांडल्या तर यावर योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असेही पोलीस अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले,यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस अधिकारी व पत्रकार उपस्थित होते

Previous articleकंपनीच्या दरवाजाची काच फोडुन ३० लाख रुपये किंमतीचे मशीन चोरणारा चोरटा जेरबंद
Next articleचारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुर्‍हाडीने मारहाण