कंपनीच्या दरवाजाची काच फोडुन ३० लाख रुपये किंमतीचे मशीन चोरणारा चोरटा जेरबंद

प्रमोद दांगट

महाळुंगे (ता.खेड,जि.पुणे) येथील ब्युईन मॅनेजो डेल कॅम्पो इंडीया या कंपनीमध्ये इमर्जन्सी एक्झीट या दरवाजाची काच फोडुन कंपनीमधील प्लॅस्टिक पेपर वेल्डिंग करण्यासाठी उपयोगात वापरले जाणारे सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे लहान मोठया मशीन अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याची घटना घडली होती .या बाबत गोब्बुरु वेंकट पवनकुमार यांनी महाळूगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती .

या गुन्हयाचे तपास करत असताना कंपनीमध्ये प्रवेश करणे व मशीन्स ठेवलेल्या कपाटामधुन मशीन्स काढुन चोरी करणे, हया गोष्टीवरुन चोरी ही कंपनीमधील माहीतीतील व्यक्तीने केली असावी असा संशय पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना आल्याने त्या अनुषंगाने त्यांनी तपास सुरु केला. कंपनी मधील संशयीत कामगारांचे मोबाईल कॉल डिटेल प्राप्त करुन त्यांचे तांत्रिक विश्लेषन व सोशल मिडीयाचे माध्यमाद्वारे शोध घेत असताना एका माजी कंपनी कामगार बाबत संशय आल्याने बातमीदार मार्फत त्याची माहीती घेतली असता तो कामगार चोरी झालेल्या मशीनचे वर्णना सारखे मशीन विक्री करीता गिन्हाईक शोधत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सदर आरोपी प्रशांत दुर्गाजी शेवाळे ( वय ४३ वर्ष, रा-लांडेवाडी, ता आंबेगाव, जि पुणे ) तो रहात असलेल्या मौजे लांडेवाडी, ता आंबेगाव, जि पुणे येथील घरातुन स्थानिक मंचर पोलीसंचे मदतीने घरास वेडा देवुन तो घरात लपून बसलेल्या असताना त्याला घरातून अटक केली.चोरी बाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला आहे.पोलिसांनी त्याचेकडुन चोरीस गेलेले ३० लाख रुपयांचे प्लेस्टिक वेल्डिंग मशीन्स त्याचे राहते घरातुन लांडेवाडी येथून जप्त केले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १ -मंचक इप्पर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ – आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, महाळुगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक(गुन्हे) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक दत्ताञय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टमपल्ले, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, राजु जाधव, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, श्रीधन इचके, शरद खैरे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टमपल्ले हे करीत आहेत.

Previous articleवाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल
Next articleनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार-प्रो.उपअधीक्षक मयूर भुजबळ