वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल

Ad 1

प्रमोद दांगट – घोडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चास (ता.आंबेगाव) येथील घोड नदीपात्रात स्मशानभूमी जवळ अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या पाच जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई शरद वसंत कुलवडे यांनी दिली आहे.

1

याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि.२७ )रोजी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास चास गावच्या हद्दीत नारोडी कडे जाणाऱ्या पुलाच्या शेजारी स्मशानभूमीजवळ घोड नदी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना कळाली त्यावेळी त्यांनी घटनास्थळी गेले असता 1)वैभव बबन कडुसकर ( वय 42 वर्षे रा.साकोरे ता.आंबेगाव जि.पुणे) 2)पवन सुधीर थोरात ( रा.चाळीस बंगला रोड, मंचर ता.आंबेगाव जि.पुणे ) 3) तुषार शांताराम टेके ( रा.वडगाव काशींबेग ता.आंबेगाव जि.पुणे ) 4)जयेश माने ( रा.चास ता.आंबेगाव जि.पुणे ) 5)सुमंत चिखले ( रा.विठ्ठलवाडी,नांदुर ता.आंबेगाव जि.पुणे ) असे गौणखनिज वाळुचे विनापरवाना उत्खणन करुन चोरी करत असताना त्यांना पोलीसांची चाहुल लागल्याने त्यातील तुषार टेके, जयेश माने ,सुमंत चिखले हे अंधाराचा फायदा घेवुन त्या ठिकाणाहुन पळुन गेले तर वैभव कडुसकर ,पवन थोरात या दोघांना ताब्यात घेतले आहे. वरील पाच जणांवर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर एल.के.शिंगाडे करत आहे.