पुणे जिल्हा भाजपा कायदा आघाडीच्या ॲड.शिवशंकर आघाव यांची सहसचिवपदी वर्णी

पुणे- भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडी कार्यकारणी जाहिर झाली तसेच तालुका अध्यक्ष कायदा आघाडी यांचा सन्मान सोहळा भाजपा कार्यालय शिवाजीनगर येथे संपन्न झाला. पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, पुणे जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी ॲड. संजय सावंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी संपूर्ण पुणे जिल्हा वकील आघाडी पदाची जबाबदाऱ्या अनेकांना दिल्या, वकील आघाडी तालुका अध्यक्ष यांचा सन्मानही करण्यात आला तसेच यामध्ये ॲड. शिवशंकर आघाव यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष भेगडे, सरचिटणीस खांडरे व जिल्हा अध्यक्ष कायदा आघाडी ॲड.संजय सावंत यांनी सभेला संबोधले

Previous articleघोडेगाव परीसरातील नागरिक, व्यापारी व दुकानदारांची अॕटींजन रॅपिड टेस्टिंग
Next articleवाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल