घोडेगाव परीसरातील नागरिक, व्यापारी व दुकानदारांची अॕटींजन रॅपिड टेस्टिंग

सिताराम काळे-घोडेगाव परीसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित नागरिकांची संख्या वाढत चालल्याने हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभाग, ग्रामीण रूग्णालय घोडेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ यांच्या सहकार्याने घोडेगाव परीसरातील व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते यांची अॕटींजन तपासणी करण्यात येत आहे.

पंचायत समिती आंबेगाव येथे या चाचण्या घेण्यात येत आहे. दि. २४ मार्च पासुन सकाळी १० ते ५ वाजपर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. गावातील सर्व व्यापारी, फेरीवाले, भाजी विक्रेते व इतर नागरिकांनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. दि. २४, २५ व २६ मार्च पर्यंत ७४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४३ जणांचा प्राथमिक अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, ग्रामीण रूग्णालयाचे वैदयकीय अधिकारी प्रताप चिंचोलीकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्षनाखाली वैदयकिय अधिकारी डॉ. तुषार पवार, डॉ. रमेश लहाने, जितेंद्र वळवी, प्रिया देशपांडे, नरेंद्र अंघारे, एम. एस. हुले, एन. आर. मराडे, संदिप कदम, सविता काळे, अक्षदा गायकवाड, उर्मिला भास्कर, कविता काळोखे, सिता वाघमारे, अतुल ठोसर, सुनिल इंदोरे, गणेश घोडेकर, स्वप्निल घोडेकर, विनय कर्पे यांनी या तपासणी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Previous articleचाकण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकास कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleपुणे जिल्हा भाजपा कायदा आघाडीच्या ॲड.शिवशंकर आघाव यांची सहसचिवपदी वर्णी