चाकण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकास कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

चाकण- खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका सौ.वृषाली योगेश देशमुख यांच्या निधीतुन प्रभागातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

गेल्या पाच वर्षात मिळालेल्या संधीचा फायदा उचलत लोकांनी आपल्याला भरभरून साथ दिली होती.त्याची परतफेड कामाच्या स्वरूपात करताना विकासकामांचा मोठा डोंगर उभा केला आहे . वार्डातील  सगळे पक्के सिमेंटचे रस्ते , पथदिवे ,बंदिस्त गटार लाईन, पेविंग ब्लॉक, पिण्यासाठी पाण्याची टाकी अशी सर्व प्रकारची कामे पूर्ण केली असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.

यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी महिलाध्यक्ष संध्याताई जाधव, चाकण शहरध्यक्ष राम शेठ गोरे, नगरसेवक विशाल नाईकवाडी, किरण कौटकर,उद्योगपती राहुल शेठ नाईकवाडी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तात्या सोरटे,कैलास भुरूक,धनंजय भांडवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रभाग 17 मधील नागरिक उपस्थित होते

Previous articleदिशा स्पोर्टस् च्या वतीने पीएसआयपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव
Next articleघोडेगाव परीसरातील नागरिक, व्यापारी व दुकानदारांची अॕटींजन रॅपिड टेस्टिंग