खडकवासला धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांची भातलावणीची लगबग सुरू

अतुल पवळे पुणे प्रतिनिधी
एकीकडे कोरोनामुळे जग चिंतेत आहे व जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला, परंतु ह्या पावसाने अचानक दडी मारल्याने मात्र शेतकरी मात्र चिंतेत होता. कारण कोरोनामुळे चिंता होतीच पण दुबार पेरणीची वेळ येती का या समस्येने कारण आधीच बि- बियाणांसाठी आधीच भरमसाठ केलेला खर्च वाया जातो का या प्रश्नाने. आधीच लाॅकडाऊन मुळे हाताशी आलेला भाजीपाला सडून गेल्याचे दुख उराशी घेऊन, भातलावणीवर ही गधा ओढवू नये हीच त्याची माफक अपेक्षा होती. ती परमेश्वराने एेकली अस वाटतय एक महिन्याचा ओढ दिल्यानंतर पावसाने दमदार सुरूवात केल्याने शेतकऱ्यांनी भातलावणीला लगबग सुरू केलेली आपणांस पाहायला मिळते.

पाऊस वर विश्वास ठेवून खडकवासला ग्रामीण भागातील पोळेकरवाडी डोणजे येथे आधुनिक पद्धतीने म्हणजेच जपानी पद्धतीचा वापर करून कृषिनिष्ठ शेतकरी विठ्ठल पोळेकर यांच्या शेतात लावणी सुरू आहे. यांचे विशेष म्हणजे ते आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करतात. भात या पिकासाठी ते फक्त शेणखताचाच वापर करतात. शेतीसाठी ते कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही,प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारे आधुनिक पद्धतीने शेती केली व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर आत्महत्येचा प्रश्नच राहणार नाही. विठ्ठल पोळेकर यांची ही शेती करण्याची पद्धत नितीन दादा वाघ यांनी समोर आणली.

Previous articleजऊळके येथील जुन्या पिढीतील चंद्रभागा खंडीझोड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
Next articleराजगुरुनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाभिक संघटनेला स्फेटी किट व धान्य वाटप