दिशा स्पोर्टस् च्या वतीने पीएसआयपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव

अमोल भोसले,उरुळी कांचन

दिशा स्पोर्टस् यांचे वतीने राज्य निवड मंडळ परीक्षेमध्ये पीएसआयपदी  निवड झालेल्या ४६ विद्यार्थी व विध्यार्थानीचा स्मृतिचिन्ह देऊन डॉ.आर एस झुंझारराव यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रसंग संजय कांबळे ,डॉ.मदन कोठुळे उपस्थित होते.

“नोकरी मध्ये अथवा जीवनात मना विरुद्ध निर्णय घेण्याचे अनेक प्रसंग येतात पण त्यामुळे माणसाने खचून न जाता आपल्या अंतर मनाचा सल्ला घेऊन जास्तीत जास्त योग्य निर्णय घ्यायचा असतो हे पुढील आयुष्यात तुम्हा सर्वांना उपयोगी पडणार आहे” असा सल्ला डॉ.आर एस झुंजारराव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्ता सरडे यांनी तर सूत्रसंचालन वैष्णवी बेंद्रे हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्धव पवार व आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleयापुढील काळात लोणीकंद पोलिस ठाण्यातील कामकाजात राजकीय हस्तक्षेप व मिलीभगत चालणार नाही – पोलिस उपायुक्त पंकज देशमुख
Next articleचाकण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकास कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन