पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; दोघे जखमी

प्रमोद दांगट, निरगुडसर

घोडेगाव भीमाशंकर रोडवर पोखरी येथे पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार (दि.२२)रोजी सायंकाळी घडली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गणेश सिताराम लोहकरे वय वर्षे २६ रा. निगडाळे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ) हे  मित्र रवी खंडू गायकवाड ,अक्षय जिजाबा कुऱ्हाडे हे तिघे जण अक्षयच्या शाईन मोटरसायकल एम.एच.१४ /९६०५ यावरून घोडेगाव येथे कामानिमित्त गेले होते. घोडेगाव येथे काम करून सायंकाळच्या सुमारास ते तिघेही मोटरसायकलवर घरी निघाले असता सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पोखरी गावाजवळ घोडेगाव भीमाशंकर रोडवर भीमाशंकर बाजूकडून एम.एच.१४ ई. एम.९४१६ या पिकप गाडीने त्यांना जोरदार समोरून धडक दिली या अपघातात फिर्यादी गणेश लोहकरे, अक्षय कुऱ्हाडे, रवि गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना तेथे जमलेल्या लोकांनी रुग्णवाहिकेद्वारे घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रवी खंडू गायकवाड ( वय २४,रा.निगडाळे, आंबेगाव ) हा मयत झाला आहे.

याबाबत गणेश लोहकरे यांनी पिकप चालक ऋषिकेश एकनाथ फलके ( रा.आमोंडी ता.आंबेगाव पुणे ) याच्याविरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleआगामी लॉंग वीक एन्ड च्या स्वागतास एमटीडीसीची रिसॉर्ट सज्ज
Next articleनारायणगाव येथे महारक्तदान शिबिरात १११६ जणांनी केले रक्तदान