धामणी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई

प्रमोद दांगट ,निरगुडसर

धामणी ( ता.आंबेगाव ) येथे हॉटेल जय मल्हार याठिकाणी अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते यांनी छापा मारून 29 हजार 387 रुपये किमतीची देशी विदेशी बनावटीची दारू जप्त केली आहे.या प्रकरणी अमोल अंकुश जाधव व राहुल सुभाष जाधव ( दोघेही रा.धामणी, ता.आंबेगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारपोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते यांना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धामणी ता. आंबेगाव गावच्या हद्दीत हॉटेल जय मल्हार येथे अमोल अंकुश जाधव, राहुल सुभाष जाधव (रा.धामणी ता.आंबेगाव) बिगर परवाना देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते, पोलिस जवान फिरोज मोमीन, पोलीस नाईक एस.एन.नाडेकर यांनी दिनांक 21 मार्च रोजी, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास, हॉटेल जय मल्हार येथे छापा मारला असता पोलिसांची चाहूल लागताच अमोल जाधव व राहुल जाधव पळून गेले असून घटनास्थळी देशी व विदेशी बनावटीची २९ हजार ३८७ रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस जवाण फिरोज अब्दुल मोमीन यांनी तक्रार दाखल केली आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तानाजी हगवणे करत आहेत.

Previous articleअवघ्या आठ दिवसातच नववधू दागिने घेऊन पसार
Next articleआगामी लॉंग वीक एन्ड च्या स्वागतास एमटीडीसीची रिसॉर्ट सज्ज