कोरोनाच्या पार्श्वभूमिवर होळी, धुलीवंदन सण / उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई

 सिताराम काळे -राज्यात व पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असुन दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने दि. २८ व २९ रोजी होळी, धुलीवंदन सण/उत्सव येत असल्याने कोव्हिड-१९ च्या पार्श्वभुमीवर सार्वजनिकरित्या साजरा करण्यास जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मनाई करण्यात आली असल्याचे तहसिलदार रमा जोषी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेशानुसार कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रार्दुभाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने पुणे जिल्हयाचे ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण /उत्सव एकत्रित येवुन सार्वजनिक ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे दि. २८ व २९ मार्च रोजी येणारे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण/उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

संबंधित आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच या आदेशामधील तरतुदीचा भंग केल्यास संबंधितांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई्र करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

Previous articleपोखरी गावाजवळ पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार तरूणांचा जागीच मृत्यू
Next articleअवघ्या आठ दिवसातच नववधू दागिने घेऊन पसार